Pune Crime News | पुण्यात SBI गोल्ड लोन घोटाळा उघड; बँकेचे अधिकृत व्हॅल्यूअर मोक्ष हिम्मतलाल जैन आणि चिराग हिम्मतलाल जैन यांच्यासह 13 कर्जदारांकडून 4.23 कोटींची फसवणुक

Pune Crime News | SBI Gold Loan Scam Uncovered in Pune; Bank's Official Valuer Moksha Himmatlal Jain and Chirag Himmatlal Jain, 13 Borrowers, Defrauded of Rs 4.23 Crores

पुणे : Pune Crime News | वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या  जागी व्हॅल्युअर म्हणून काम करत असताना दोघा भावांनी १३ जणांशी संगनमत करुन बनावट सोने तारण ठेवून स्टेट बँकेची ४ कोटी २३ लाख ४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मनोजकुमार (वय ४३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोक्ष हिम्मतलाल जैन (Moksha Himmatlal Jain) आणि चिराग हिम्मतलाल जैन Chirag Himmatlal Jain (रा. शनिवार पेठ) यांच्यासह १३ कर्जदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ मे २०२५ पासून आतापर्यंत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हे स्टेट बँकेच्या हिंगणे शाखेचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या शाखेमध्ये हिम्मतलाल जैन हे सराफ गेली काही वर्षे व्हॅल्युअर म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्याचे निधन झाले. त्यानंतर त्यांची दोन मुले मोक्ष व चिराग जैन यांची सोने तारणासाठी व्हॅल्युअर म्हणून नेमणूक केली. त्यांनी १३ सोने तारण ठेवणार्‍या लोकांचे बनावट सोन्याचे दागिने हे खरे असल्याचे प्रमाण पत्र दिले. त्यावरुन बँकेकडून अर्जदारांनी ४ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील सुरुवातीला काही हप्ते या कर्जदारांनी भरले. त्यानंतर कर्जदारांनी हप्ते थकविले. बँकेने कर्जदारांना अनेकदा नोटीस पाठवूनही त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत, तसेच सोने सोडवुन घेतले नाही. त्यानंतर कर्ज थकल्याने तारण ठेवलेल्या सोन्या विषयी शंका आली. त्यामुळे बँकेने नवीन सराफाकडून सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी केली. त्यात तारण ठेवलेले सोने हे बनावट व कमी शुद्धतेचे असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्याच्या पडताळणीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ तपास करीत आहेत.

You may have missed