Pune Crime News | पुणे : महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये शिरुन विद्यार्थ्यांना मारहाण करुन गुंडांनी दिली जीवे मारण्याची धमकी; ‘सिंबायोसिस कोपोऊ’ होस्टेलमधील घटना

Pune Crime News | Pune: Goons entered the college hostel, beat up students, and threatened to kill them; incident at 'Symbiosis Copou' hostel

पुणे : Pune Crime News | महाविद्यालयाच्या हॉस्टेलबाहेर शतपावली करणार्‍या विद्यार्थ्यांचा चष्मा काढून घेऊन हॉस्टेलमध्ये शिरुन गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण करुन जीव मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सिंबासोसिस हॉस्टेलचे वॉर्डन राकेश कैलास घरडे (वय ५२, रा. गुरुवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओमकार सतिश घाडगे Omkar Satish Ghadge (वय १९, रा. जय जवाननगर, येरवडा), रुबेन रिचर्ड कदम Ruben Richard Kadam (वय २०, रा. साईनाथनगर, चंदननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील सिंबायोसिस कोपोऊ हॉस्टेलसमोरील फुटपाथ व हॉस्टेलमध्ये १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमध्ये सिंबायोसिस महाविद्यालयाचे कोपोऊ हॉस्टेल आहे. त्यातील २ विद्यार्थी जेवण झाल्यानंतर रात्री  हॉस्टेल समोरील फुटपाथवर शतपावली करीत होते. त्यावेळी दोघे गुंड तेथे आले. त्यांनी एकाचा चष्मा काढून घेतला. तुम्ही इंग्लिशमध्ये काहीतरी शिवीगाळ करता, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करु लागले.  बेकायदेशीर जमाव जमवुन सिमेंटच्या ब्लॉकने व हाताने त्यांना मारहाण करुन जखमी केले. हॉस्टेलमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करुन हॉस्टेलच्या आत येऊन तेथील विद्यार्थ्यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत.

You may have missed