Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विवाहित नराधमाने पावणेसात लाख रुपये घेऊन केली फसवणूक

Pune Crime News | Pune: Married man who sexually assaulted a young woman on the pretext of marriage cheated her of Rs. 7.5 lakh

पुणे : Pune Crime News | विवाह झाला असतानाही तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपण एकत्र राहुया असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ६ लाख ७१ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ३२ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर ऊर्फ सॅम कृष्णकांत कुमरे Sagar alias Sam Krishnakant Kumar (रा. अरेनाकुल होम्स, बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कुमरे याचा विवाह झाला असतानाही फिर्यादी यांची ओळख काढून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आपले लग्न झाले आहे, हे तरुणीपासून लपवून ठेवले. तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपण एकत्र राहुया असे खोटे आश्वासन दिले. या तरुणीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी ६ लाख ७१ हजार रुपये घेतले. तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारल्यावर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने सागर कुमरे याची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला सागर कुमरे याचा यापूर्वीच विवाह झाला असल्याचे समजले. आपली फसवणूक करुन अत्याचार केल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस सागर कुमरे याचा शोध घेत आहेत.

You may have missed