Pune Crime News | पुणे : 43 कोटींच्या ठेवी घेणार्‍या वेलेंटिना इंडस्ट्रीजकडून फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Pune Crime News | Pune: Pune Police's Economic Crime Branch appeals to contact if you are cheated by Valentina Industries, which took deposits worth Rs 43 crores

पुणे : Pune Crime News | गुंतवणुकदारांना भागीदार असे संबोधुन त्यांच्याकडून ठेवी स्वीकारणार्‍या वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालकांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. वेलेंटिना इंडस्ट्रीज व एलएलपी कंपनीचे संचालक व इतरांकडून परतावा देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक झाली असल्यास संबंधितांनी कागदपत्रे व पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी हजर रहावे, असे आवाहन केले आहे.

वेलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीच्या कर्वे रोडवरील सक्सेस स्क्वेअर येथील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी कारवाई करुन संचालक संतोष नाथा बांदल Santosh Natha Bandal (रा. गिडणी पार्क, सॅलिसबरी पार्क)आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे Dnyaneshwar Anant Chorge (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या स्कीम गुंतवणुकदारांना आमिष दाखविण्यासाठी तयार करुन गुंतवणुकदारांना कागदोपत्री १ टक्का आणि प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याबाबत खोटे आश्वासन दिले. गुंतवणुकदारांना चुकीची माहिती देऊन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन अनियमित ठेवी स्वीकारल्या आहेत. पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयात तसेच संचालकांच्या घरी छापे टाकून महत्वाची काही कागदपत्रे जप्त केली आहे.

कंपनीने जवळपास २ हजारांहून अधिक लोकांकडून ४३ कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. कंपनीकडून परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली  असल्यास संबंधित कागदपत्रे व पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तपासकामी हजर रहावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुप्तावार्ता विभागाचे चौकशी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे व पोलीस पथकाने केली आहे.

You may have missed