Pune Crime News | पुणे : कमरेला दोन पिस्टल लावून फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Crime News | Pune: Police arrest criminal who roams around with two pistols on his waist

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन असताना खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याने विरोधी गट हल्ला करेल, या भितीने कमरेला दोन पिस्टल लावून फिरणाऱ्या  सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सोहम गोविंद धुमाळ Soham Govind Dhumal (वय १८, रा. पुण्यनगरी सोसायटी, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव शेरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सोहम धुमाळ हा अल्पवयीन असताना त्याचा एका खुनाच्या गुन्ह्यात सहभाग होता. त्यामुळे विरोधी गटातील गुन्हेगार आपला गेम करतील, या भीतीने पिस्टल बाळगल्याचे सोहम धुमाळ याने पोलिसांना सांगितले.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना त्यांच्या बातमीदाराने सांगितले की, मांगडेवाडी येथील सुंदरनगर येथे एक जण अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे. या बातमीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांचे सहकारी सुंदरनगर येथे पोहचले. तेथील गुरुदत्त मित्र मंडळ लगतच्या मोकळया जागेत एक जण संशयास्पदरित्या थांबलेला दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे विचारपूस करीत असताना तो कमरेच्या मागील बाजूस आतमध्ये हात घालून काहीतरी लपवुन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख रुपयांचे २ गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.

You may have missed