Pune Crime News | अल्पवयीन मुलासह साथीदाराला पकडून विश्रामबाग पोलिसांनी केल्या 14 मोटारसायकली जप्त

Pune Crime News | Pune police caught an accomplice with a minor and seized 14 motorcycles

पुणे : Pune Crime News | नवी पेठेतील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अल्पवयीन मुलाला विश्रामबाग पोलिसांनी पकडले. त्याचा साथीदार वैभव सांगुळे पळून गेला. अल्पवयीन मुलगा व त्याचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी चोरलेल्या १४ मोटारसायकली  विश्रामबाग पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

नवी पेठेतील चिमणबाग सोसायटी येथील फिर्यादी यांची मोटारसायकल २३ जून २०२६ रोजी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नारायण पेठेत दोघे संशयित थांबले आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात वैभव सांगुळे (रा. सुतारदरा, कोथरुड) हा पळून गेला. त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या आत्याच्या उपस्थितीत चौकशी केली. त्यांनी कृष्णा शेळके याला दोन मोटारसायकली विकल्याची माहिती मिळाली़.त्यावरुन पोलिसांनी कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६, रा. माळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला अटक केली. या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले. समर्थ, हडपसर, काळेवाडी, भारती विद्यापीठ, विमानतळ पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर जिल्ह्यातील ५ गुन्हे असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरट्यांकडून एकूण १४ मोटारसायकली जप्त केल्या असून २ मोटारसायकलीच्या मालकांचा शोध सुरु आहे. वैभव सांगुळे याचा पोलीस शोध घेत आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप,  पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार अमोल भोसले, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड, उमेश गव्हाणे यांनी केली आहे.

You may have missed