Pune Crime News | पुणे : बुधवार पेठेत पोलिसांचा मोठा छापा; 15 बांगलादेशी नागरिक ताब्यात, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Pune Crime News | Pune: Police raid Budhwar Peth; 15 Bangladeshi nationals arrested, prostitution busted

पुणे : Pune Crime News | बुधवार पेठेतील  डिस्को आणि माचीस या इमारतीवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या ११ महिला आणि त्यांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करणार्‍या ३ पुरुषांसह १५ बांगला देशी नागरिकांना पोलिसांनी पकडले आहे.

बोर्ना खानम नदीम शेख (प्रियांका (वय २०, रा. डिस्को बिल्डिंग),  होशनारा होजुर बिशास (वय ४३, रा. माचीस बिल्डिंग),  सोमय्या अख्तर मोहम्मद. दिलवर हुसेन खलिफा (वय २२),  मोसम्मद रव्या प्रवीण अन्वर शेख (वय ३०),  मुसम्मद पारुल खातून अबुलबशर होबीबुर(वय ३०), लवली खातून नजरुल शरीफ (वय २८), रुणा अमजित शेख (वय ३०), तस्लीमा ईशा शेख (वय ३५), मेरिखातुन अख्तर हुसेन (वय ३५), झुमा आलमीन लष्कर (वय ३०), अक्का ज्योती उर्फ सबिना अस्लम शेख (वय ४०, सध्या सर्व रा. माचीस बिल्डिंग, बुधवार पेठ, मुळ रा. पश्चिम बंगाल), लवलीचा पती मोहिदुल सन्मिया शेख (वय २६, रा. कात्रज), बोर्नाचा पती सोजोल आलम फकीर (वय २७, रा. डिस्को बिल्डिंग), व्यवस्थापक समीर मुस्तफा हलवदार (वय २९, रा. मसाज बिल्डिंग), राहुल वीरेंद्र शर्मा (वय २४, मुळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश), मालक सुमित मिलिंद चव्हाण (वय ३३, रा: मंगळवार पेठ) तसेच मोईदुल आणि लवली यांचा ७ वर्षाचा मुलगा अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत.

बुधवार पेठेत बांगला देशींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना वारंवार मिळत होती. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी सातत्याने कारवाई करुन बांगला देशींना ताब्यात घेतले आहे.

खडक पोलिसांनी सोमवारी रात्री साडे अकरा पासून छापा घालून सर्च घेण्यास सुरुवात केली. पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कारवाईत तब्बल ११ बांगला देशी महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. एका १५ वर्षाच्या तरुणीला वेश्या व्यवसायात ढकलले जात होते. एकूण १५ बांगला देशी नागरिक येथे आढळून आले. पश्चिम बंगालची ज्योती ऊर्फ सबिना ही या सर्व वेश्या व्यवसायावर अक्का म्हणून लक्ष ठेवून होती.

राहुल शर्मा आणि समीर हलवदार हे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. तर सुमित चव्हाण या दोन इमारतींमध्ये चालणार्‍या या वेश्या व्यवसायाचा मुख्य मालक आहे. पोलिसांनी या छाप्यात चार मोबाईल तसेच हिशोबाच्या दैंनदिन नोंदी असलेल्या डायर्‍या ताब्यात घेतल्या आहेत.
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली खडक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

You may have missed