Pune Crime News | पुणे : रीलस्टार माधवी कुंभारसह 7 आरोपींची येरवडा जेलमध्ये रवानगी; आणखी दोन युवतींसह तिघांना अटक
पुणे : Pune Crime News | मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात रीलस्टार माधवी राजेश कुंभार हिच्यासह सात आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. बागे यांनी ३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवस वाढ करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर सातही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
माधवी राजेश कुंभार Madhavi Rajesh Kumbhar (वय २३), स्नेहल संजय सोनके Snehal Sanjay Sonke (वय २०), राहुल सिताराम वाघमारे Rahul Sitaram Waghmare (वय २०), शिवानंद ऊर्फ शिवराज ऊर्फ सुच्चा सिद्धप्पा तलवार Shivanand alias Shivraj alias Suchcha Siddhappa Talwar (वय २१), आदित्य ऊर्फ आदी सुनील भालेराव Aditya alias Aadi Sunil Bhalerao (वय २२), प्रियांशु ऊर्फ पियुष प्रदीप भोसले Priyanshu alias Piyush Pradeep Bhosale (वय २२) आणि प्रेम ऊर्फ पम्या मनोज साळवे Prem alias Pamya Manoj Salve (वय २२) अशी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
डेक्कन पोलिसांनी या सातही आरोपींना १५ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यांना यापूर्वी २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना यापूर्वी निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून डेक्कन पोलिसांनी ‘फ्लाईंग जिप्सी कॅफे’चे (Flying Gypsy Cafe)मालक हेमंत आनंद पाटील Hemant Anand Patil (वय ४२) आणि व्यवस्थापक प्रेम दीपक पाटील Prem Deepak Patil (वय २१) यांना १९ ऑगस्ट रोजी अटक केली होती.
याच प्रकरणात पोलिसांनी वैष्णवी ऊर्फ सिया रवींद्र भास्कर Vaishnavi alias Siya Ravindra Bhaskar (वय २२), वैभव मधुकर भागवत Vaibhav Madhukar Bhagwat (वय २१) आणि समीक्षा शैलेश शेळके Samiksha Shailesh Shelke (वय २१) यांना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता अटक केली आहे.
या प्रकरणातील इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
