Pune Crime News | कोथरूडमध्ये तरुणाकडून दोन देशी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | कोथरूड परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका १९ वर्षीय तरुणाकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी तरुणाविरोधात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम देवेंद्र साळुंखे Prem Devendra Salunkhe (वय १९, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी शिवप्रसाद दहीफळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळेवाडी परिसरातील कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेजवळ ही कारवाई करण्यात आली. साळुंखे याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसताना दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही पिस्तुले त्याच्याकडे कुठून आली, ती कोणी उपलब्ध करून दिली आणि ती बाळगण्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे, तपास पथक अधिकारी सपोनि सुधीर घुले, पोहवा दत्तात्रय सोनवणे, पोहवा राजेंद्र लांडगे, पोहवा श्रीकांत दगडे, पोहवा शकील पठाण, पोशि शिवप्रसाद दहिफळे, पो शि मयुर पांढरे, पो शि वैभव शितकाल, पोशि गणेश डोंगरे, पोशि ऋषीकेश कोळप, पोशि आकाश वाल्मिकी, यांचे पथकाने केली आहे.
