Pune Crime News | पुणे : बंगल्याच्या आवारात गुप्त गांजाची शेती; लोहगाव पोलिसांची धडक कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News | Pune: Secret cannabis cultivation in bungalow premises; Lohegaon police take action, seized valuables worth six lakhs

पुणे : Pune Crime News | लोहगाव परिसरात एका बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची ४१ झाडे, वाहन आणि मोबाईल असा सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना पठारे वस्ती परिसरात गांजाची शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२७ एप्रिल) छापा टाकण्यात आला.

या कारवाईत हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०) याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची लागवड केल्याचे समोर आले. बंगल्याच्या आवारात लहान-मोठी अशी ४१ गांजाची झाडे आढळून आली असून त्यांचे एकूण वजन सुमारे साडेचार किलो होते. तसेच आरोपीच्या वाहनातूनही गांजा जप्त करण्यात आला.

घटनास्थळावरून नऊ मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणी हर्ष पांचाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे, तसेच पोलिस हवालदार गणेश इथापे, गणेश सातपुते, पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम, सचिन जाधव, ज्ञानेश्वर आवारी, युवराज चौधरी, अशोक थोरात यांच्या पथकाने केली आहे.

You may have missed