Pune Crime News | पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घरफोडीचा गुन्हा आणला उघडकीस

Pune Crime News | Pune: The Anti-Dacoity and Anti-Vehicle Theft Squad apprehended a known criminal and solved a case of housebreaking.

पुणे : Pune Crime News | भवानी पेठेतील अग्रवाल कॉलनीतील एका सोसायटीत घरफोडी करुन पसार झालेल्या रेकॉर्डवरील चोरट्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन पकडले.

मनीष महेंद्र काकडे Manish Mahendra Kakade (वय २९, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ११ जून रोजी अग्रवाल कॉलनीतील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने ऐवज लांबविण्याची घटना घडली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस अंमलदार राठोड, लोखंडे, शिंदे यांनी मिळून १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात गुन्हा केलेल्या गुन्हेगाराने अ‍ॅक्टीव्हा गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले.  त्यावरुन गुन्ह्यात वापरलेली गाडीचा मुळ मालक व ती सध्या कोण वापरत आहे, याची माहिती प्राप्त करुन पोलिसांनी मनिष काकडे याला ताब्यात घेतले. चौकशीत घरफोडी करण्यासाठी काकडेने वापरलेली दुचाकी त्याच्या भावाची असल्याचे उघड झाले. त्याच्याकडील दुचाकीची डिक्की तपासण्यात आली. डिक्कीत ३० हजारांची रोकड सापडली. काकडे याने चोरलेला मोबाइल  मित्राला दिल्याचे सांगितले. त्याला पुढील कारवाईसाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अमित गद्रे, महेश पाटील, बाळु गायकवाड, धनंजय ताजणे, साधना पवार यांनी केली आहे.

You may have missed