Pune Crime News | पुणे : सर्वांसमोर पतीचा अपमान झाल्याच्या तणावातून महिलेने गळफास घेत संपविले जीवन; बिबवेवाडी पोलिसांनी दोघा जीम ट्रेनर पती-पत्नींना अटक करुन डॉक्टर महिलेसह 6 जणांवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: Woman hangs herself due to stress over husband being insulted in front of everyone; Bibwewadi police arrest two gym trainer husband and wife and register case against 6 people including doctor

पुणे : Pune Crime News |  जीम ट्रेनर म्हणून काम करत असताना तेथील रिसेप्शनिस्टला त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर सर्वांसमोर पतीला मारहाण केली.  सर्वासमोर पतीचा अपमान झाल्याच्या तणावामुळे महिलेने सुसाईड नोट लिहित घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले. बिबवेवाडी पोलिसांनी तिच्या जीम ट्रेनर प्रियकर पती पत्नीला अटक केली असून डॉक्टर महिलेसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोनाली गौरव धुर्डे (वय ३४, रा. विघ्नहर नगर, रणधीर हाऊस, बिबवेवाडी) असे या दुदैवी महिलेचे नाव आहे. सचिन मोहन जुन्नरकर Sachin Mohan Junnarkar (वय ३८), अश्विनी सचिन जुन्नरकर Ashwini Sachin Junnarkar (वय ३३, दोघे रा. ढमाले कॉम्प्लेक्स सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश राजेंद्र अंबिलवादे (Mahesh Rajendra Ambilvade), निता महेश अंबिलवादे Nita Mahesh Ambilvade (रा. गुजरवाडी, कात्रज) आणि डॉ. अमिता ढेकणे (Dr. Amita Dhekane) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बिबवेवाडीतील विघ्नहर नगरमधील रणधीर हाऊस येथे २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते २८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान घडली. याबाबत मोनाली यांच्या पतीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीम ट्रेनर म्हणून सचिन जुन्नरकर म्हणून काम करतो, त्याच ठिकाणी मोनाली धुर्डे ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम पहात होती. सचिन जुन्नरकर याने जीममध्ये काम करत असताना मोनाली हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. विवाह झाला असतानाही मोनाली त्याच्या बोलण्यावर मोहीत होऊन प्रेमात वाहत गेली. त्यातून तो तिला त्रास देऊ लागला. सचिन जुन्नरकर, अश्विनी जुन्नरकर व इतर आरोपी हे त्यांच्या घरात अनाधिकृतपणे शिरले. त्यांनी मोनाली व तिच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली. सर्वांसमोर फिर्यादी व त्यांची पत्नी मोनाली यांना अपमानित केले. फिर्यादी व मोनाली पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल यादी दिली. ते उपचार करुन दोघे घरी गेले.

दरम्यान, इतर आरोपींनी मोनाली हिला फोन करुन तु पोलिसांकडे तक्रार देऊ नको, नाही तर वाईट परिणाम होतील, असे धमकावले होते. त्यातून मोनालीचा मानसिक ताण वाढला. रात्री फिर्यादी हे झोपले असताना मोनाली हिने सुसाईड नोट लिहून घरी मुलाला झोका खेळण्यासाठी छताच्या हुकाला आधी लावलेल्या दोरीला गळफास घेऊन  आपले जीवन संपविले. फिर्यादी यांना पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी जाग आल्यावर मोनालीने केलेले कृत्य समजले.

माझ्यामुळे माझ्या पतीला अपमानित व्हावे लागले. या प्रकाराला मीच जबाबदार आहे, असे मोनाली हिने चिठ्ठीत लिहिले होते. सर्वांसमोर मारहाण करुन लोकांसमोर झालेला अपमान तिला सहन झाला नाही, त्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक पोलीस निरीक्षक सावंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक भरत वाघ तपास करीत आहेत.

You may have missed