Pune Crime News | पुणे : पूर्वीचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न; येरवडा परिसरातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News | Pune: Woman run over by car in attempt to force withdrawal of a previous case; shocking incident in Yerwada area.

पुणे : Pune Crime News | पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका २९ वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमीर रशीद शेख Amir Rashid Shaikh (वय ३२, रा. कलवड, पुणे), हैदर रशीद शेख Haider Rashid Shaikh (वय ३४, रा. कलवड) तसेच अन्वर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भरधाव कारने महिलेला धडक दिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. “तू माझ्यावर आणि माझ्या भावावर दाखल केलेली केस मागे घे. आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर तुझा काटा करू,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आरोपींचा अधिक तपास सुरू आहे.

You may have missed