Pune Crime News | रात्री घरफोडी करणार्या दोघा सराईतांना पकडून वाघोली पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणून हस्तगत केला अडीच लाखांचा माल
पुणे : Pune Crime News | रात्री घरफोडी करणार्या दोघा सराईत चोरट्यांनी वाघोली पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकीसह अडीच लाखांचा माल जप्त केला आहे.
रोहित हनुमंत राक्षे Rohit Hanumant Rakshe (वय ३२, रा. टकलेनगर, प्रेम रेसिडेन्सी, शेवाळवाडी, मांजरी) आणि मनोज आनंद गायकवाड Manoj Anand Gaikwad (वय २४, रा. हरगुडे कॉम्प्लेक्स, सणसवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांनी नावे आहेत.
वाघोली परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व दीपक कोकरे यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची नावे निष्पन्न झाली़ त्यावरुन पोलिसांनी रोहित राक्षे व मनोज गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडे मिळालेली दुचाकी त्यांनी वाघोलीतील काळेचा ओढा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून वाघोलीतील दोन घरफोड्या उघडकीस आल्या असून त्यांच्याकडून ५ ग्रॅम सोने, ७५ ग्रॅम चांदी, दुचाकी, ३ मोबाईल असा २ लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे यांनी केली आहे.
