Pune Crime News | गे डेटिंग अॅपवरुन मैत्री करुन भेटायला बोलावुन मारहाण करुन लुबाडणार्या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी केले अर्ध्या तासात जेरबंद
पुणे : Pune Crime News | गे डेटिंग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे मैत्री करुन भेटायला बोलावुन घेऊन मारहाण करुन मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करुन घेऊन चांदीची चैन हिसकावुन नेणार्या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या २ तासात जेरबंद केले़
ओम गणेश वाघमारे Om Ganesh Waghmare (वय २०, रा. चिंतामणी सोसायटीच्या मागे, वारजे माळवाडी), गणेश उत्तम माने Ganesh Uttam Mane (वय २७, रा. आकाशनगर, वारजे), जगदीश रामु पवार Jagdish Ramu Pawar (वय २३, रा़. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्या चोरट्यांचे नाव असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्वेनगर येथे राहणार्या एका २५ वर्षाच्या तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे गे डेटिंग अॅपवरुन एकमेकांशी चॅटिंग करत होते. त्यात त्यांची ओळख झाली़ २८ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलाने फिर्यादी याला कर्वेनगर येथील डी मार्ट शेजारील कट्ट्यावर भेटायला बोलावले. रात्री साडेअकरा वाजता तो तेथे गेल्यावर त्याने आपण लाँग ड्राईव्हवर जाऊ असे सांगून महादेव मंदिराजवळील अंधार व र्निमनुष्य असलेल्या जागी गाडी थांबवली. तो फिर्यादीला म्हणाला की, माझा भाऊ या भागातील कंपनीमध्ये काम करतो. त्याच्याकडून माझ्या घराची चावी घेतो, मग आपण जाऊ, असे म्हणून तो बराच वेळ कोणाला तरी सारखे फोन करत होता. बराच वेळ ते मोकळ्या जागेत थांबले होते. त्यानंतर त्याचे ३ साथीदार आले. तेव्हा तो म्हणाला की, हा मुलगा मला या ठिकाणी सेक्स करण्यासाठी घेऊन आला आहे. त्यानंतर त्याने दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारले.
ओम वाघमारे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल घेऊन त्यातून ८ हजार ६०० रुपये ट्रान्सफर करुन घेतले. गणेश माने याने गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेतली.
या गुन्ह्याची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही जबरी चोरी करणार्यांपैकी एक जण अतुलनगर चौकामध्ये थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुलनगर चौकातून ओम वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत इतरांना पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखिल तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे यांनी केली आहे.
