Pune Crime News | महिलेला व्यावसायानिमित्ताने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडले

Pune Crime News | Woman called for business, sexually assaulted and robbed, threatening to make photos viral

पुणे : Pune Crime News |  सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून महिलेला त्याने व्यावसायानिमित्त बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ते अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिक रामचंद्र गोगावले Pratik Ramchandra Gogawale (रा. गोगलवाडी, ता. भोर)  याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  हा प्रकार २०१८ पासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रतिक गोगावले यांची फेसबुकवर २०१८ मध्ये ओळख झाली. त्यातून त्याने फिर्यादी यांना तू दूरची बहिणी लागते, असे म्हणून ओळख वाढविली. प्रतिक पान दरबार चालवित असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने प्रोटिन पावडर विक्रीसाठी नांदेड सिटी येथे मित्राचा रुमवर बोलावले. तेथे त्याने फिर्यादींना मिठी मारल्याने त्या तेथून निघून गेल्या. काही दिवस त्याचा फोन घेतला नाही. त्यानंतर त्याने सॉरी म्हणून पुन्हा संपर्क केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त २०२२ मध्ये ते दोघे फिर्यादीच्या चारचाकी गाडीतून मांडवी येथील हॉटेल राणा येथे गेले. तेथे त्याने फिर्यादी यांना तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर, अशी मागणी घातली. त्यावेळी त्यांनी माझे लग्न झाले असून तू जे करत आहेस, ते चुकीचे आहे, असे बोलल्या. तरीही त्याने त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी त्याने नकळत त्यांचे न्युड फोटो काढले. त्यानंतर त्याने तु कोणाला सांगितले तर, तुझे न्युड फोटो फॅमिली ग्रुपवर टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या हॉटेलवर नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. हॉटेल सरोवर, भुगाव येथे पार्टनरशिप करता पैसे भरायचे असल्याने त्यांचे मंगळसुत्र व अंगठी लक्ष्मी ज्वेलर्स येथे गहाण ठेवून प्रतिकने पैसे घेतले. त्यानंतर त्यांच्या दुकानात येऊन त्यांच्याकडून काऊंटरवरुन भरपूर वेळा पैसे घेऊन गेला.

२०२४ मध्ये  प्रतिक त्यांच्याशी बोलणे टाळू लागला. त्यांना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी समजले की प्रतिक याचा साखरपुडा झाला आहे. त्यांनी मेसेज करुन त्याला विचारले. तेव्हा त्याने घरच्यांच्या दबावाखाली साखरपुड केला आहे़, असे सांगितले. त्यानंतर त्याने मोबाईलने ब्लॉक केले. पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के तपास करीत आहेत.

You may have missed