Pune Crime News | पैशांसाठी अडवून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; मोबाइल हिसकावून तिघे फरार

Pune Crime News | Why did he message his girlfriend, a gang seriously injured a young man by putting a stamp on his head, asking him to answer

पुणे : Pune Crime News |  कात्रज-कोंढवा रस्त्यावर दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीवर पैशांची मागणी करत तिघा अज्ञातांनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानतेश दानप्पा डोमनाळ (वय 38) हे 24 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दूध घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माउलीनगर बसस्थानकासमोर तिघा अज्ञातांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली.

डोमनाळ यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाले. त्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील सुमारे 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर डोमनाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed