Pune Pimpri Crime News | पिंपरी : भेटीसाठी बोलावून तरुणावर कोयत्याने हल्ला; चिखलीतील संविधान चौकातील धक्कादायक घटना

Pune Crime News

पिंपरी : Pune Pimpri Crime News | चिखली येथील संविधान चौकात एका तरुणाला भेटीसाठी बोलावून त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रवी कांबळे (वय 28, रा. अजिंठनगर, चिंचवड) यांना आरोपी अमित तानाजी जानराव Amit Tanaji Janrao
 (रा. घरकुल, चिखली) याने संविधान चौकात भेटण्यासाठी बोलावले होते.

भेटीनंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी अमित याने आपल्या ताब्यातील कोयत्याने विजय कांबळे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी विजय कांबळे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

You may have missed