Pune Lohegaon Airport | पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानांचा अपघात; 86 विमाने 9 तासानंतर विमानतळ हळुहळु सुरु
पुणे : Pune Lohegaon Airport | आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्रीच्या सुमारास हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला. या विमानाचे लँडिंग गियर निकामी झाले. त्यामुळे या विमानाने ईमर्जन्सी लँडिंग करताना ते धावपट्टीवर घासत गेले. त्यामुळे धावपट्टीचे मोठे नुकसान झाल. तसेच हे विमान धावपट्टीवरच अडकून पडल्याने सर्व विमान सेवा ठप्प झाली. जवळपास ९ तासांच्या प्रयत्नानंतर हे विमान बाजूला करण्यास व धावपट्टीची दुरुस्ती करण्यास यश आले आहे. शनिवारी सकाळी ९ वाजल्यानंतर विमानांचे उड्डाण व आगमन हळुहळु सुरु झाले आहे. या काळात ८६ विमाने रद्द करण्यात आली किंवा इतर विमानतळाकडे वळविण्यात आली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाचे एक लढाऊ विमान उतरत असताना त्याचे लँडिंग गियर निकामी झाले. त्यामुळे हे विमान धावपट्टीवर घासत गेल्याने धावपट्टी खराब झाली. तसेच हे विमान धावपट्टीवर अडकून बसले. त्यामुळे पुण्यात येणारी व जाणारी सर्व विमानसेवा ठप्प झाली.
विमानतळ प्रशासनाने क्रेन मागवून हे विमान अगोदर बाजूला घेतले. त्यानंतर धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. युद्ध पातळीवर हे काम सुरु करण्यात आले. जवळपास ९ तासांच्या प्रयत्नानंतर धावपट्टी विमान उड्डाणास सज्ज करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास विमानांचे उड्डाण आणि आगमन सुरु झाले आहे. काही तासात विमानतळावरील वाहतूक पूर्ववत होईल, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या अपघातामुळे मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास पुण्याहून इतरत्र जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
