Pune News | १० वी पुणे जिल्हा सिलंबम चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात संपन्न

Pune News | 10th Pune District Silambam Championship 2026 Concludes with Enthusiasm

७०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शिस्त, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे शानदार प्रदर्शन

पुणे : Pune News | पारंपरिक भारतीय युद्धकला सिलंबमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना रुजविणाऱ्या १० व्या पुणे जिल्हा सिलंबम चॅम्पियनशिप २०२६ला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिलंबम असोसिएशन पुणे यांच्या वतीने, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व ऑल इंडिया सिलंबम फेडरेशनच्या संलग्नतेने आयोजित ही जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवार पेठ विभागातील नगरसेविका मा. सौ. गायत्रीताई खडके आणि राज्यस्तरीय शेलार मामा पुरस्कार विजेते श्री. दिलीप आव्हाळे सर यांच्या हस्ते झाले.

दुपारच्या सत्रात नगरसेविका मा. सौ. स्मिताताई वस्ते, असेन्ट मर्जर्सचे संस्थापक व एमएसएमई तज्ज्ञ श्री. राहुल अमृतकर, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चोरमले, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. योगेश कंठाळे, रक्ताचे नाते संस्थेचे अध्यक्ष श्री. राम बांगड आणि सिलंबम असोसिएशन पुणेचे उपाध्यक्ष श्री. प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढविले.

७०० विद्यार्थ्यांनी गाजवली स्पर्धा

पुणे शहर व परिसरातील विविध शाळा आणि सिलंबम प्रशिक्षण केंद्रांमधून तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे, चपळाईचे आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.

मुलांच्या गटात डी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, टिळक रोड संघाने विजेतेपद पटकावले. वनाज परिवार विद्या मंदिर, कोथरूड संघाने द्वितीय तर जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूल, वारजे संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

मुलींच्या गटात न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. डी.एम.एस.एफ. संघाने द्वितीय तर मृत्युंजय मर्दानी खेळ आखाडा, चिखली संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

नवजीवन स्पोर्ट्स अकॅडमी, दिघी संघाला उत्कृष्ट संघाचा किताब प्रदान करण्यात आला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे विजयी शाळा, प्रशिक्षण केंद्रे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

यावेळी डी.ई.एस. प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना धनावडे, एन.ई.एम.एस. स्कूल शनिवार पेठच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख, जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूल, वारजेच्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या वाजपेयी, डी.एम.एस.एफ.च्या संस्थापिका सौ. काजल मोरे व श्री. स्वप्निल मोरे, मृत्युंजय मर्दानी आखाड्याचे अध्यक्ष श्री. ओमकार सोनवणे तसेच नवजीवन स्पोर्ट्स अकॅडमीच्या संस्थापिका सौ. दिपाली पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सिलंबम असोसिएशन पुणेचे सचिव मा. कुंडलिक कचाले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी घेतलेल्या परिश्रमांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

आयोजक, प्रशिक्षक व पंचांचे मोलाचे योगदान

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिलंबम पुणेची संपूर्ण टीम, मा. श्री. कुंडलिक कचाले सर व विद्या कचाले मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली. डी.ई.एस. प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे, क्रीडा शिक्षक श्रीकांत जोशी, एन.ई.एम.एस.चे क्रीडा शिक्षक प्रमोद उकिर्डे व देविदास वाकळे तसेच जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या सिलंबम प्रशिक्षिका स्नेहल शिंदे यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

श्री. दिलीप आव्हाळे, श्री. चंद्रशेखर महाले, ओम संघपुल्लम, शक्तीप्रसाद पात्रा, प्रनिष गायकवाड, भूषण बोडके, शंतनू उभे, प्रणव पांढरे, सानिका टाकळकर, प्रतीक्षा कांबळे, ज्ञानेश्वरी मोरे, पूजा मोरे, प्रज्वल गायकवाड, अवंती सकुंटे, ब्रह्माश्री मस्के, वैभवी थोरात, ईश्वरी कदम, प्राची भोसले, अपूर्वा आंबेडे, प्रथमेश सावंत, मानसी भिसे, आसना चव्हाण, वैष्णवी शेळके, मुद्रा बोडके, साई जगताप, संध्या खजे, मल्हार सोनवणे, स्वामिनी जोशी, स्वामिनी निजामपूरकर, अथांग गोणेकर, वीरेंद्र कचाले, प्रितेश राठोड, सोहम तावरे, निलेश पुजारी, राजवीर सुतार, हर्षद जन्नू व यश ढवळे यांनी पंच व परीक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली.

श्री. आनंद व्हावळे आणि श्री. गणेश पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

सिलंबममधून घडतेय नवी पिढी

७०० विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांची मोठी उपस्थिती, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि आयोजकांचे अथक परिश्रम यामुळे १० वी पुणे जिल्हा सिलंबम चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि भारतीय पारंपरिक क्रीडा संस्कृतीची जपणूक करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

या स्पर्धेतील यशाबद्दल सर्व विजेते विद्यार्थी, सहभागी खेळाडू, पालक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, पंच आणि आयोजकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

You may have missed