Pune News | विश्व हिंदू परिषद कात्रज जिल्हा वर्धापन दिनानिमित्त ‘समरसता महायज्ञ’ आणि ‘ॐ नमः शिवाय’ जप अनुष्ठान उत्साहात संपन्न
कात्रज: Pune News | विश्व हिंदू परिषद कात्रज जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘समरसता महायज्ञ’ आणि ‘ॐ नमः शिवाय’ जप अनुष्ठान सोहळा दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जा आणि पवित्र वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विहिंप जिल्हा मंत्री शार्दूल ठाकूर आणि बजरंग दल सहसंयोजक आशिष दुसाने यांच्या हस्ते विधिवत ‘महारुद्र अभिषेक’ करण्यात आला*. त्यानंतर उज्जैनचे संत श्रीमहंत श्रीकांत दास महाराज यांनी उपस्थितांना मोलाचे आशीर्वचन दिले.
विश्व हिंदू परिषदेचे , केंद्रीय समरसता आयाम प्रमुख गणेश मोकाशी यांनी या समरसता यज्ञाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, “समाजातील उच्च-नीच भेद आणि जातींमधील भेदभाव दूर करून सर्वांनी या समरसता यज्ञात आहुती दिल्यास आपसातील मतभेद मिटतात. हिंदू एकतेचा संदेश देणे हाच या यज्ञाचा मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी प. महाराष्ट्र समरसता आयाम प्रमुख श्री निखिल जी कुलकर्णी ही उपस्थित होते ” यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख धनाजी शिंदे यांनी आयाम व विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
त्यानंतर मुख्य ५ कुंडीय समरसता यज्ञाला सुरुवात झाली. या यज्ञात सुमारे १६० पेक्षा जास्त महिला व पुरुषांनी उत्साहाने सहभाग घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर पूज्य संतांच्या हस्ते सर्व साधकांना ‘रुद्राक्ष’ देण्यात आले. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर सर्व भाविकांना ‘राम खिचडी’ प्रसादाचे वाटप करण्यात आले. यज्ञात आहुती दिल्यानंतर सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता आणि आनंद ओसंडून वाहत होता.
या प्रसंगी जिल्हा मंत्री श्री. शार्दूल ठाकूर, बजरंग दल सहसंयोजक श्री. आशिष दुसाने, मातृशक्ती संयोजिका सौ उल्काताई सराळकर, दुर्गावाहिनी प्रांत टोळी सदस्य सौ. पूजाताई शर्मा, मंदिर अर्चक पुरोहित आयाम प्रांत टोळी सदस्य श्री. विक्रांत घोडके, श्री. राजेंद्र देशपांडे, जिल्हा प्रमुख श्री. गौरव थिटे, अर्चक श्री. चैतन्य रेडे, श्री. चौघुले, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. गणेश चव्हाण, आंबेगाव प्रखंड मंत्री श्री. सुजित गुरव, श्री. श्रीराम शेमडे, बजरंग दल संयोजक श्री. मंगेश कुंजीर यांच्यासह मान्यवर व विहिंप आणि बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
