Pune Pimpri Crime News | प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या  प्रेयसीच्या 6 वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने खुन करुन फरार झालेल्या प्रियकरास दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी अंबाजोगाईमधून केले जेरबंद

Pune Pimpri Crime News | The Dakshin Mhalunge police arrested the boyfriend who had murdered his girlfriend's 6-year-old son with the help of his girlfriend and fled from Ambajogai

पुणे : Pune Pimpri Crime News | प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाला प्रेयसीच्या मदतीने  प्रियकराने पाण्याच्या बादलीत डोके बुडवले. तो बेशुद्ध झाल्यावर बाथरूम च्या भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याचा निर्घुण खुन केल्यानंतर फरार झालेल्या प्रियकराला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अंबाजोगाई येथून जेरबंद केले आहे.

राम विनायक कजेवाड (वय ३०, रा. कुरुळी, ता. खेड, मुळ रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बसरीन मेहबुब शेख (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड, मुळ माहेरचे गाव धमार्पुरी, ता. परळी, जि. बीड, सासरचे गाव पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्या आईचे नाव आहे. आवेज मेहबुब शेख (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे.  हा प्रकार कुरुळी गावात बसरीन हिच्या घरी ४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.

बसरीन शेख ही सध्या कुरुळी येथील एका कंपनीत कामाला आहे. तिचा प्रियकर राम कजेवाड हा कॅबचालक म्हणून पुण्यात काम करतो. बसरीन शेख हिचे मेहबुब शेख याच्याबरोबर लग्न झाले आहे. त्यांना आवेज हा ६ वर्षाचा मुलगा होता. मेहबुब शेख हा मोलमजुरी करतो. त्यांच्या गावातील राम कजेवाड याच्याबरोबर बसरीन हिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून  बसरीन शेख मुलाला घेऊन ४ महिन्यांपूर्वी राम कजेवाड याच्याबरोबर पुण्यात आली. त्या दोघांमध्ये आवेज याचा अडथळा होत होता. त्यामुळे त्यांनी ४ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाथरुमधील पाण्याच्या बादलीत आवेज याचे डोके बुडवून दाबुन धरले. तो बेशुद्ध झाल्यावर बाथरुमचे भिंतीवर व जमिनीवर डोके आपटून ठार केले. त्यानंतर दोघेही आवेज याचा मृतदेह घेऊन बसरीन हिच्या माहेर धमार्पुरी येथे आले. त्यांनी आवेज याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यांनी ही बाब तिच्या सासरी पुस येथे इसाक शेख यांना कळविली. त्यांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक परळी ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिसांनी आवेज याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठविला. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यु जखमांमुळे झाल्याचा अहवाल दिला. त्यावरुन पोलिसांनी चौकशी केल्यावर आम्ही त्याला मारल्याची हकीकत बसरीन हिने पोलिसांना दिली.

पोलिसांनी बसरीन हिला अटक केली तरी राम कजेवाड हा पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याचा शोध घेत असताना बाणेर येथे त्याने कॅब सोडून दिल्याचे आढळून आले. त्याचा तपास करीत असताना तो तिरुपती येथे गेल्याचे आढळून आले़. पोलिसांचे पथक तिरुपतीला रवाना झाले. पोलीस तिरुपतीला पोहचले. तोपर्यंत तो तिरुपतीहून निघून गेला होता. अंबाजोगाईला गावी आल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी अंबाजोगाईला जाऊन त्याला १७ एप्रिल रोजी पकडले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ़ महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, सहायक पोलीस फौजदार चौधरी, पोलीस अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन  सावंत, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड यांनी केली आहे.

You may have missed