Pune Pimpri News | पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार! 6-7 वर्षांच्या मुलाने रिक्षा चालवली, वडील मागे बसले (Video)

Pune Pimpri News | Shocking incident in Pimpri-Chinchwad! 6-7 year old boy drives rickshaw, father sits behind (Video)

पुणे : Pune Pimpri News | पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतूक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड येथील फिनिक्स मॉलसमोरील मुख्य रस्त्यावर अवघा सहा ते सात वर्षांचा मुलगा ऑटो रिक्षा चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/DXd8TboiZgp

व्हिडिओमध्ये लहान मुलगा रिक्षाचे स्टेअरिंग हाताळत मुख्य रस्त्यावर वाहन चालवत असल्याचे स्पष्ट दिसते. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, त्याचे वडील रिक्षाच्या मागील सीटवर बसून प्रवास करताना दिसत आहेत. या प्रकारामुळे मुलाच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ही घटना गजबजलेल्या रस्त्यावर घडल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता. अशा परिस्थितीत अपघात घडला असता, जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालकांची बेजबाबदारी आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संताप व्यक्त होत आहे.

तसेच, एवढ्या लहान मुलाकडून वाहन चालवले जात असताना वाहतूक पोलिसांचे लक्ष का गेले नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीनांना वाहन चालवण्यास सक्त मनाई असून, संबंधित पालकांवर कडक कारवाईची तरतूद आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

You may have missed