Pune Police News | जुगारी अड्डा चालविणार्‍यांशी संबंध ठेवणार्‍या पोलीस हवालदार, अंमलदारास पोलीस उपायुक्त यांनी सुनावली शिक्षा

Pune Police News

पुणे : Pune Police News |  अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये थारा न देण्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भूमिका वारंवार सांगितली होती. त्यानंतरही जुगार अड्डा चालविणार्‍यांशी संबंध ठेवणार्‍या गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार व अंमलदार यांना पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी शिक्षा सुनावली आहे.

पोलीस हवालदार अभिनव बापुराव लडकत (Abhinav Bapurao Ladkat) आणि पोलीस अंमलदार शुभम जयवंत देसाई (Shubham Jaywant Desai) अशी या दोघांची नावे आहेत. दोघांची नेमणूक गुन्हे शाखेच्या युनिट १ मध्ये करण्यात आली होती.

समर्थ पोलीस ठाण्या अंतर्गत औदुंबर अर्जुन सोनावणे (वय ६५, रा. नागेश्वर मंदिराजवळ, सोमवार पेठ) याला ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान औदुंबर सोनावणे याने बाळा ऊर्फ प्रविण राजेंद्र चव्हाण (रा. सोमवार पेठ) याच्यासाठी मटका जुगार घेत असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी बाळा ऊर्फ प्रविण चव्हाण याच्याविरुद्ध कारवाई करुन त्याला १७ जानेवारी २०२५ रोजी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासमोर हजर केले होते. त्यावेळी आरोपीकडील मोबाईलची पडताळणी केली असता त्यामध्ये पोलीस हवालदार, अंमलदार यांच्याशी संपर्क असल्याचे दिसून आले आहे. 

त्याबाबत अधिक पडताळणी करीत असताना पोलीस हवालदार अभिनव लडकत हे शुभम देसाई आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करत असल्याने आरोपीबरोबर संशयास्पद रित्या संपर्कात होता. या वरुन तुमचे आरोपीशी व तो चालवत असलेल्या अवैध धंद्याशी संबंध असल्याचे दाट शक्यता आहे. तसेच या दोघांना वारंवार या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या  होत्या. तसेच गुन्हेगारी टोळीशी संबंध न ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्याचे दिसून आलेले नाही. रेकॉर्डवरील आरोपी बाळा चव्हाण याच्या संपर्कात असल्याबाबत रेकॉर्ड मिळून आले. त्याबाबत प्राथमिक चौकशीअंती निष्पन्न झाले.  त्यामुळे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दोघांना देय वार्षिक वेतनवाढ त्याप१ुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अश रितीने २ वर्षे कालावधीसाठी रोखण्याची शिक्षा केली आहे.