Pune Shirur Crime News | शिरूरमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद; एटीएस पुणे ग्रामीण व पोलिसांची संयुक्त कारवाई
पुणे: Pune Shirur Crime News | शिरूर तालुक्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना दहशतवाद विरोधी पथक (ATS) पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून सुमारे ५०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सुमित वसंत शेळके Sumit Vasant Shelke (वय २०, रा. पळवे शेळकेवस्ती, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि साजीत रफिक खान Sajit Rafiq Khan (वय ३०, रा. मंगलमूर्ती नगर, शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शिरूर-सतराकमान रोडवरील पांजरपोळ परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन थांबलेला आहे. या माहितीनुसार पोलीस पथकाने वेषांतर करून सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३ आणि २५ प्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर एलसीबी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड,विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम,रवींद्र जाधव, विशाल भोरडे,मोसीन शेख,ओंकार शिंदे,जालिंदर मुळीक,सुनील कोळीतसेच शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार एन.टी.पिसाळ यांचे पथकाने केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत
