Pune Traffic Police | पुणे : मद्यपान करुन वाहन चालविणार्‍या 171 जणांवर विशेष मोहिमेत कारवाई़

Pune Traffic Police | Pune: Action taken against 171 drunk driving suspects in special drive

पुणे : Pune Traffic Police |  मद्यपान करुन वाहन चालविल्यास अपघाताचा धोका वाढत असल्याने शहर पोलीस दलाच्या वतीने सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ३ दिवस विशेष मोहिमेत मद्यपान करुन वाहन चालविणार्‍या १७१ चालकांवर कारवाई करण्यात आली.

पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने शुक्रवार २४ एप्रिल ते रविवारी २६ एप्रिल २०२६ दरम्यान ३ दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील विविध भागात ३३ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारण्यात आले़ येणार्‍या जाणार्‍या संशयित वाहनचालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. या कारवाईत १७१ वाहनचालक मद्यपान करुन गाडी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मद्यप्राशन करुन वाहन चालविणे हा गंभीर व दंडनीय अपराध आहे. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षणीय वाढतो. स्वत:च्या जीवाबरोबरच इतरांच्या जीवाला धोका असतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.

You may have missed