Pune Crime News | पुणे : विशेष मोहिमेत 58 लाखांचा 289 ग्रॅम एमडी, 422 ग्रॅम गांजा, 260 ग्रॅम एमडी पावडर जप्त करुन 19 आरोपींना अटक

Pune Crime News | Pune: 289 grams of MD, 422 grams of marijuana, 260 grams of MD powder worth Rs 58 lakh seized in special operation, 19 accused arrested

पुणे : Pune Crime News | परिमंडळ ७ मधील पोलीस ठाण्यांनी एप्रिल महिन्यात राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेत तब्बल १३ कारवाया करुन एकूण १९ आरोपींना पकडले. त्यांच्याकडून २८९ ग्रॅम, एम डी, ४२२ ग्रॅम गांजा, २६० ग्रॅम एम डीचा अंश असलेली पावडर असा ५८ लाख १८ हजार २५० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

त्यात प्रामुख्याने विमानतळ, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद, लोहगाव या पोलीस ठाण्यांच्या परिसरात कारवाया करण्यात आल्या आहेत. १ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. त्यात अटक करण्यात आलेले आरोपी

विमानतळ : त्रिस्तन प्रफुल्ल कुलकर्णी ( वय ३०,  रा. साईनाथ नगर, वडगावशेरी), उबैद अनसार खान (वय २५, रा. गायकवाड सोसायटी, फ्लॅट नंबर २०३, अमीना मंझिल, सय्यद नगर रेल्वे गेट जवळ, हडपसर)

चंदननगर : व्यंकटेश गंगप्पा चव्हाण (वय १९, रा. नवरत्न हाउसिंग सोसायटी, वडगाव शेरी), सार्थक बलराज खंडाळे (वय १९, रा. पोस्ट ऑफिस शेजारी, धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी), अमित उपदेश यादव (वय २३ वर्षे, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी), सुमित संजय लांडगे (वय २५,  रा. रामवाडी, रामवाडी वस्ती, अहिल्यानगर रोड, रामवाडी)

खराडी : प्रवीण पुनमचंद बिझोई (वय २२, रा. रूम नं. १, ए विंग, कमल विला, गोकुळ नगर, कात्रज चौक)

वाघोली : योगेश सुभाष कनसे (वय २८, रा. शिवकृपा बिल्डिंग, लेन नं. ३, साई नगर, लोणीकंद़ मूळ रा. माळी घोगरगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर), निलेश सदाशिव भोसले (वय ३६,  रा. भोसले वस्ती, मराठी शाळेजवळ, वाघोली बुद्रुक, ता. हवेली), मनविंदर शंकर सिंग, वय ४२, रा. टिंगरेनगर), रमेश उदाराम सुतार, वय ३४, रा. योजनानगर, लोणीकंद, मूळ रा. कोटडा, तहसील-सांचोर, जि. जालोर, राजस्थान)

लोणी काळभोर : पुंजाजी जयवंत चौधरी (वय ४०, रा. जय मल्हार सोसायटी, फुलमळा रोड, वाघोली, मूळ रा़ निपाणे, ता. मोताळा, पिरोबा मंदिराजवळ, जि. बुलढाणा), भागीरथ सजनसिंग राजपुरोहित(वय २८, रा. मांजरी गॅस एजन्सी, ता. हवेली मूळ रा. मादडी गाव, राजस्थान), आदिनाथ दशरथ शिंदे (वय २९, रा़ मांजरी गॅस एजन्सी, ता. हवेली), योगेश लक्ष्मण चव्हाण (रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), राजेंद्र केरू टेळे (वय ३५, रा. चंद्रमा हॉटेलचे पाठीमागे, अथर्वनगर, चाकण-शिक्रापूर रोड, शिक्रापूर, ता. शिरूर), करण सचिन मोहिते (वय २१, रा. मु.पो. सणसवाडी, पुणे नगर हायवे लगत, ता. शिरूर)

लोहगाव : शबनम हानिफ शेख (वय ३४, रा. भुकन वस्ती, गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव)

अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने राजस्थान येथून मेफेड्रोन (एम डी) अंमली पदार्थ प्राप्त केले असल्याचे सांगितले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितले. विशेष पथक तयार करुन राजस्थान येथे जाऊन त्यांना अंमली पदार्थ पुरविणार्‍या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि परिमंडळ ७ मधील पोलीस अधिकारी, अंमलदारांनी केली आहे.

You may have missed