BJP Lifafa Pattern In Maharashtra | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी भाजपाकडून ‘लिफाफा’ पॅटर्न; कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
मुंबई: BJP Lifafa Pattern In Maharashtra | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. पुढील काही दिवसात उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. उमेदवारी बाबत भाजपाकडून वेगळा प्लॅन आखण्यात येत आहे. गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे. भाजपकडून पितृपक्ष संपल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
https://www.instagram.com/p/DAnO9mlJmUc
त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात इच्छुक उमेदवारांची नावे मागवून घेतली जातात. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून वरिष्ठांकडे द्यायची आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे बोलले जात आहे
https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC
भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.
https://www.instagram.com/p/DAnWANGpMmM
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’