Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचा प्रताप ! महिलेला म्हणाला – ‘तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल’
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचा प्रताप सर्वांसमोर आला आहे. त्याने एका महिलेला ‘‘तू मला खूप आवडेतस, माझ्यासोबत एकटी बंद केबीनमध्ये चल, आपण वैयक्तिक बोलू’’ असे म्हणून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Molestation Case)
https://www.instagram.com/p/DAnp-EwCbQ1
एका ३० वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police) फिर्याद दिली असून पोलिसांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत गणपत लाड (Chandrakant Ganpat Lad (वय ५५, रा. साईआनंद पार्क, ज्ञानदीप कॉलनी, कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभाग कक्षात मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडला.
https://www.instagram.com/p/DAniUBVCJy8
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोग्य कक्षात असताना चंद्रकांत लाड त्यांच्याजवळ आला व त्याने फिर्यादींना ‘‘मी तुझ्या सोबत बोलतो, तु मला खूप आवडते. माझ्या सोबत एकटीच बंद केबीनमध्ये चल. आपण वैयक्तिक बोलू’’ असे बोलला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यावर परत त्याने फिर्यादीस ‘‘मी तुला नोकरीत सवलत देतो, तुला वेळोवेळी सुट्या देतो, त्यामुळे माझे तू एक काम कऱ माझ्यासोबत केबीनमध्ये चल,’’ असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला. सिंहगड रोड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI Suresh Jaybhay) तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DAnWANGpMmM
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’