Mahayuti Vs Mahavikas Aghadi | उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी महायुतीचा प्लॅन?; दसऱ्यापूर्वीच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
मुंबई : Mahayuti Vs Mahavikas Aghadi | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरिध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यात आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati), बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि राजू शेट्टींसह (Raju Shetti) अन्य नेत्यांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची (Maharashtra Third Front) घोषणा केली आहे त्यामुळे आगामी विधानसभेला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/DApufhdiIIq
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर तसेच हरियाणा राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यावर कधीही लागू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या मेळाव्यावर बंधने यावीत यासाठी राज्यात चार दिवस आधीच म्हणजे दसऱ्यापूर्वीच आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
तसेच आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने सरकारदरबाही देखील निधी मंजुरी आणि कामांच्या घोषणा करण्याची घाई दिसून येत आहे. राज्य सरकारने एकाच आठवड्यात दोन वेळा मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)
https://www.instagram.com/p/DApq1GViZ1f
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’