Devendra Fadnavis On School Girls Assault Case Pune | पुण्यातील लैंगिक गुन्ह्याच्या घटनेनंतर फडणवीसांनी दिले मोठे आदेश; म्हणाले – ‘आता संस्थाचालकांना…’
पुणे: Devendra Fadnavis On School Girls Assault Case Pune | वानवडी (Wanwadi) येथे सहा वर्षांच्या असलेल्या दोन विद्यार्थीनींचा स्कूल बसच्या ड्रायव्हरने लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ड्रायव्हर संजय जेटिंग रेड्डी याला अटक करण्यात आली आहे. मुलांच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO Act) त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
https://www.instagram.com/p/DApis5HiKOY
दरम्यान या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सर्व संस्थाचालकांना बोलावून त्यांना संस्थेत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वर्तन योग्य आहे की, नाही याबाबत तपासणी करण्यास सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका चालकाने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले आहे. यासह त्याने आणखी एका मुलीलाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरोधात आता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कठोर कलमे लावण्यात आली आहे.”
https://www.instagram.com/p/DApnifUJzzl
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाशी संबंधित संस्थाचालकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांचा काही दोष आहे का हे तपासले जात आहे. विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही, याची तपासणी केली पाहिजे याबाबत इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे .
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’