Gang Rape In Bopdev Ghat Pune | पुणे : मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या २१ वर्षाच्या तरुणीवर रात्री अकरा वाजता सामुहिक बलात्कार
पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या एका २१ वर्षाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
https://www.instagram.com/p/DAqzXKzCEbo
बोपदेव घाटात मित्रांसोबत दोन दिवसांपूर्वी फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करुन आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा बलात्कारीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/DAqtxYQCh51
संबंधित पीडित तरुणी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री हे दोघे दुचाकीवरुन बोपदेव घाटात रात्री उशिरा फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण तेथे आले. त्यांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित मुलीस तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बाबत रुग्णालयातून कोंढवा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती झाली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ५ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DAqshAkiPJb
याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी सांगितले की, जेथे ही घटना घडली तो भाग एकाकी आणि काळोखात आहे. पहाटे ५ वाजता पोलिसांना याची माहिती झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची १० पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. कोंढवा पोलिसांचे तपास पथकही शोध घेत असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. (Gang Rape In Bopdev Ghat Pune)
https://www.instagram.com/p/DAqqDAnCUK_
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’