Police Vehicle Accident News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात, 12 पोलीस जखमी

Police Vehicle Accident

नाशिक : Police Vehicle Accident News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस वाहनाला अपघात झाला, ज्यात 12 पोलीस जखमी झाले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime News) चांदवड जवळील राहुड घाटात घडली. घटनेतील जखमी पोलिसांना चांदवडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी पोलीस नाशिक ग्रामीण विभागातील (Nashik Rural Police) आहेत. नेमका अपघात कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

https://www.instagram.com/p/DAsflEWpfjN

मुख्यमंत्री शुक्रवारी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात येणार होते. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण विभागची पोलीस तुकडी चांदवड मार्गे जात असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातील वळणावर वाहनाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा पंरतू याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

https://www.instagram.com/p/DAsb72XJRig

घटनेची माहिती कळताच जखमी पोलीस कर्मचार्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही पोलिसांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काहींची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असून लवकरच अपघाताचे कारण समोर येईल असे सांगण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/DAsdvytpZVf

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed