Shivsena Thackeray Vs Shivsena Shinde Group | ‘सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट’, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘मला इंजेक्शन देऊन…’

Uddhav-Thackeray-On-Eknath-Shinde

अकोला: Shivsena Thackeray Vs Shivsena Shinde Group | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेण्यात आलं होतं. सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट काही लोकांनी रचला होता”,असा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF

बाळापूरमध्ये नागरिकांशी (दि.४) संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “माझ्यामागे या सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. माझ्या दहावीत शिकणाऱ्या मुलाची चौकशी चालू आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या मुलीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे.

https://www.instagram.com/p/DAtIL-wJ0Br

हे सगळं पाहूनही तुमचा हा आमदार कधी डगमगला नाही. पक्ष फुटला तेव्हा मी सुरतला गेलो होतो. कुठल्या परिस्थितीत त्या लोकांनी मला नेलं, माझा घात केला ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे”, असे देशमुख यांनी म्हंटले.

https://www.instagram.com/p/DAs6mMaJdxT

शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. दरम्यानच्या राजकीय घडामोडींवर आमदार देशमुख यांनी भाष्य केले आहे. नितीन देशमुख म्हणाले, ” पक्ष फुटले, गद्दारी झाली त्या काळात मला सुरतला कशापद्धतीने नेलं हे मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. त्या लोकांनी मला इंजेक्शन दिलं आणि घेऊन गेले.

https://www.instagram.com/p/DAs31QFpwyR

त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांना बातमी दिली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खरंतर मला असा कोणताही झटका आला नव्हता. त्यांना केवळ तशी बातमी पसरवायची होती. ती बातमी केवळ तुमच्या या आमदाराचा घातपात करण्यासाठीच पसरवली होती”, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

https://www.instagram.com/p/DAswsxvJcNa

ते पुढे म्हणाले, ” एका भाजपा आमदाराचे ट्रेनमध्ये वरिष्ठांशी बोलणं झालं. दिल्लीतून फोन आला होता की कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये. त्याला हवं तर मारून टाका, त्याचा गेम करा. त्याचदरम्यान, टीव्हीवर बातमी झळकली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मला कोणताही झटका आला नव्हता.

https://www.instagram.com/p/DAsflEWpfjN

केवळ त्या लोकांना वरून फोन आला होता की नितीन देशमुख ऐकत नसेल तर त्याचा गेम करून टाका. मला मारून तशी बातमी दाखवली जाणार होती. हे सगळं भाजपाचा एक आमदार सांगत होता. परंतु, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांचा मावळा आहे. मी त्यांच्यासमोर झुकलो नाही. गद्दारांबरोबर गेलो नाही.

https://www.instagram.com/p/DAsb72XJRig

माझी तुम्हा मतदारांकडून एकच अपेक्षा आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. तेव्हाच माझे समाधान होईल. तुमच्या या आमदाराला पराभूत करण्यासाठी केवळ साधेसुधे प्रयत्न चालू नाहीत तर कटकारस्थाने चालू आहेत”, असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAsVO-Kpdyd

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed