Ramnagar Yerawada Pune Crime News | गुंडाने फोडल्या गाड्यांच्या काचा ! येरवड्यातील रामनगरमध्ये पसरविली दहशत

पुणे : Ramnagar Yerawada Pune Crime News | येरवड्यातील रामनगर परिसरात एका गुंडाने मोठमोठ्याने आरडाओरडा करीत पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला (Vandalism Of Vehicles). सागर संतोष माने (रा. रामनगर, येरवडा) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत ओंमकार सुरेश म्हामुणकर (वय २७, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार रामनगरमधील सेंट मेरी चर्चच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्लीत सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माने हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने फिर्यादीच्या टाटा टेम्पोवर कोयत्याने मारुन काचा फोडल्या. तसेच रंजना नवले यांचा टेम्पो आणि इकबाल सैय्यद यांची स्कुल व्हॅन ओमनी गाडी यांच्या काचांवर कोयता मारुन तोडफोड केली. तेव्हा रंजना नवले यांन त्याला तू आमच्या गाड्यांचे नुकसान का करत आहे, असे विचारले असता, तो आरडाओरडा करत त्यांना म्हणाला की, कोणीही मला अडवे येऊ नका, असे म्हणून त्याने हवेत कोयता फिरवला.
https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3
जर मला कोणी अडवले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही़ आणि जर पोलिसांत तक्रार दिली तर मी तुला बघून घेईल, असे म्हणून आरडाओरडा करुन धमकी दिली. त्यामुळे रंजना नवले व तेथे उभे असलेले लोक घाबरून निघून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत (API Mithun Sawant) तपास करीत आहेत. (Ramnagar Yerawada Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DA2lQsPis6x
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’