Theft In Omkareshwar Temple Pune | पुण्यातील पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात चोरी ! दरवाजाचे लॉक तोडून दान पेटी फोडली

Omkareshwar Temple Pune

पुणे : Theft In Omkareshwar Temple Pune | पुण्यातील प्रसिद्ध पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. गाभार्‍यातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्याने चेहरा झाकून घेतला असल्याने त्याची ओळख पडू शकली नाही. (Shaniwar Peth Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA2uCK0ijzv

याबाबत कौस्तुभ उल्हास गाडे (वय ४०, रा. शनिवार पेठ, ओंकारेश्वर मंदिराशेजारी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ आॅक्टोबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे. जवळपास २८४ वर्षाचा इतिहास या मंदिराचा आहे. मराठा साम्राज्यात कृष्णाजी पंत चित्रव यांनी त्यांचे आध्यामिक गुरु शिवराम भट यांच्या आदेशानुसार हे मंदिर बांधले होते, असे मानले जाते. महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारीही येथे गर्दी असते.

https://www.instagram.com/p/DA2lQsPis6x

ओंकारेश्वर मंदिराला दोन प्रमुख दारे आहेत. त्यातील नदीकाठी असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. त्यानंतर त्याने गाभार्‍यात प्रवेश केला. तेथील दान पेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे ६ हजार रुपये चोरुन नेले. सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पवार, गायकवाड यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. मंदिरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/DA2ivy9ItUq

सीसीटीव्हीमध्ये चोरटा दिसून येत आहे. मात्र, त्याने आपली ओळख पटू नये, म्हणून अगोदरच संपूर्ण चेहरा झाकला असल्याचे दिसून येते. पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला असावा, असे सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed