Chandan Nagar Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला पिस्टल, काडतुसासह चंदननगर पोलिसांकडून अटक
पुणे : Chandan Nagar Pune Crime News | पिस्टल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला सिनेस्टाईल पाठलाग करुन चंदननगर पोलिसांनी पकडले. समाधान लिंगाप्पा विभुते Samadhan Lingappa Vibhute (वय ३२, रा. पळशी सुपली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्टल व ५ काडतुसे जप्त करण्यात आली. (Pistol Sized)
https://www.instagram.com/p/DA3VDZZJdqF
चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (PSI Rahul Kolpe) व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी लिंगाप्पा विभुते हा सुंदराबाई शाळा येथे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. ही माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाचे सुदंराबाई शाळा येथे सापळा रचला. समाधान विभुते हा दुचाकीसह आला. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला दुचाकीसह पकडले. त्यांच्याकडील सॅकमध्ये देशी बनावटीचे पिस्टल व बॅगेमधील एका छोटया प्लाटिकच्या पिशवीमध्ये पितळी धातूचे ५ काडतुसे असा ९५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
https://www.instagram.com/p/DA3Tt-tpMR_
ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonvane) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (Sr PI Sanjay Chavan), गुन्हे निरीक्षक अनिल माने (Anil Mane), सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (Dattatary Ligade), पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे , पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, विकास कदम, प्रफुल्ल मोरे, नामदेव गडदरे, सचिन पाटील, अमोल जाधव यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DA3OOagJN8a
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’