Kasba Assembly Constituency | कसब्यातून धीरज घाटे यांना उमेदवारी द्या ! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुणे शहर भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी
मुंबई : Kasba Assembly Constituency | भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना येत्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे केली. पुणे शहरातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. (Pune BJP)
https://www.instagram.com/p/DA20O3LpWwm
धीरज घाटे यांना कसब्यातून उमेदवारी दिल्यास गेल्या पोटनिवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो. त्यामुळे पक्ष नेतृत्त्वाने याचा विचार करावा, असे साकडे यावेळी घालण्यात आले.
https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr
गेल्या ३० वर्षांपासून कसबा विधानसभा मतदारसंघात पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार तळागाळात नेण्यासाठी निष्ठेने काम करणारा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ही श्री. धीरज घाटे यांची ओळख आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात हिंदुत्त्ववादाला वाहून घेतलेले आणि हिंदूच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात कसबा मतदारसंघातील गणेश मंडळे हेच प्रमुख आकर्षण असते.
याच भागामध्ये गणेशोत्सवातून घडलेले आणि गणेश मंडळांना कायम मदत करणारे नेतृत्व म्हणून धीरज घाटे यांची ओळख आहे. साने गुरुजी तरूण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम त्यांच्याकडून राबविले जातात. लोकांची कामे करणारा आणि अडचणीच्या वेळी त्यांच्यासाठी धावून जाणारा ही सुद्धा धीरज घाटे यांची प्रतिमा जनमानसात लोकप्रिय आहे. त्यामुळेच पक्षाने तिकीट वाटपावेळी या सर्व मुद्द्यांचा विचार करून श्री. धीरज घाटे यांना संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
https://www.instagram.com/p/DA210j7JyoM
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांतपणे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि लवकरच याबाबत पक्षाच्या संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’