Raghavendra Bappu Mankar | विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध

Raghavendra Bappu Mankar | Raghavendra Bappu Mankar elected unopposed as Vishrambag Wada Ward Committee President

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा आदर्श निर्णय

पुणे: Raghavendra Bappu Mankar | भारतीय जनता पार्टीचे प्रभाग २५ मधील नगरसेवक मा. राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची आज विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदभार स्वीकारतानाच बाप्पू मानकर यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारून, त्यातून वाचणारा खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आज पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत, प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांची बिनविरोध झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळातील काम हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले.

गाडीचा मोह टाळला; सेवेला प्राधान्य!

अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श पायंडा घालून दिला. महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी त्यांनी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च हा पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

या आधीही नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक पदाचे मानधान नाकारून तो निधी महापौर वैद्यकीय सहायता निधीमध्ये वर्ग केला आहे.

You may have missed