Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, त्यामुळे आपलेच सरकार येईल’, फडणवीसांचे पदाधिकारी मेळाव्यात वक्तव्य; म्हणाले – ‘अतिआत्मविश्वास ठेवू नका अन् गाफील राहू नका’

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

मुंबई : Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात बोलताना सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांची लाभार्थी आहे. त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) पुन्हा येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

https://www.instagram.com/p/DAnO9mlJmUc

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती आहे. पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2

आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवू नका किंवा गाफील राहू नका, असा सल्लाही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed