Pune Politics News | पर्वती, खडकवासला, कॅंटोन्मेंट मतदारसंघात भाजपला फटका बसणार?, सर्वेक्षणातून माहिती समोर; संविधान मेळावे अन् लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम न घेतल्याने पक्षश्रेष्ठींची नाराजी

पुणे : Pune Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातून मोठा खुलासा समोर आला आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींनी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) बाबत तसेच दलित मेळावे (Dalit Melava) सारखे कार्यक्रम सूचना देऊनही न घेतल्याने पक्षश्रेष्टी नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मागील १५ वर्षात म्हणावी अशी कामे मतदारसंघात झाली नाहीत अशी माहितीही सर्वेक्षणातून समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/DAnSeVuCZ31
शहरातील पर्वती (Parvati Assembly Constituency), खडकवासला (Khadakwasla Assembly Constituency), कॅंटोन्मेंट मतदारसंघातील (Pune Cantonment Assembly Constituency) आमदारांनी संविधान मेळावे (Savidhan (Constitution) Melava) तसेच लाडकी बहीण मेळाव्याचे कार्यक्रम न घेतल्याने पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेश भाजपकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुण्यामध्ये भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार असल्याचे समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC
अँटी इन्कम्बन्सीचा सूर असलेल्या मतदारसंघात पक्ष चाचपणी करण्याची शक्यता असून पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपशी संलग्न असलेल्या एका संघटनेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुद्धा पर्वतीमध्ये पक्षाला फटका बसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. (Pune Politics News)
https://www.instagram.com/p/DAnO9mlJmUc
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’