Gold-Silver Price Today | अक्षय्य तृतीया पूर्वी सोन्याची झळाळी वाढली; चांदीतही बदल, आजचा भाव काय? जाणून घ्या
पुणे : Gold-Silver Price Today | अक्षय्य तृतीया जवळ येत असल्याने, सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये जोरदार वाढीचा कल दिसून येत होता.
देशांतर्गत बाजारपेठेत, एप्रिलच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांमध्ये झालेली मोठी घसरण पाहता, त्यानंतर आता दरांमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. आज, शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी, भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दिसून आला; सोन्याचे दर वधारले असले, तरी चांदीच्या दरांमध्येही बदल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज, देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५६,१७५ रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४४,४१० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
