Pune Crime News | आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर यांना घेऊन जाणार्या पोलीस व्हॅनचा पाठलाग करुन रेकी करणार्या सुरज ठोंबरेच्या टोळीवर मोक्का कारवाई
पुणे : Pune Crime News | गँगस्टर बंडु आंदेकर टोळीतील गुन्हेगार कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर व तुषार वाडकर यांना शिवाजीनगर न्यायालयातून पुन्हा धुळे कारागृहात घेऊन जाताना पोलीस व्हॅनचा पाठलाग करुन पोलीस बंदोबस्ताची माहिती फोनवरुन दिल्याप्रकरणात पोलिसांनी सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. (Suraj Thombre Gang)
या प्रकरणी वेदांत रोहित सावंत Vedant Rohit Sawant (वय २१, रा. वनराई कॉलनी, केशवनगर, धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे Atharva Dattatray Khopde (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज), धीराज लखारा Dhiraj Lakhara (रा. धनकवडी) यांना अटक केली होती. त्यांच्यासह सुरज अशोक ठोंबरे Suraj Ashok Thombre (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (वय २४, रा. सावरकर चौक, धनकवडी) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सुरज ठोंबरे याने स्वत:ची संघटीत टोळी तयार करुन गुन्हे केलेले आहेत.
अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने हत्यार बाळगणे, दहशत माजविणे, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. आरोपी यांनी संघटितपणे दहशतीच्या मार्गाने गुन्हे केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्फत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे सादर केला. राजेश बनसोडे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल, सचिन सरपाले यांनी केली आहे.
