Pune Crime News | …अन् फटाका बुलेटचा आवाज झाला कायमचा शांत ! मध्यरात्री फटाका बुलेट सायलेन्सर वाजवुन दहशत निर्माण करणार्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करुन 11 बुलेट केल्या जप्त
पुणे : Pune Crime News | मध्यरात्री सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढत फिरुन दहशत निर्माण करणार्या बुलेटस्वारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली. त्यात ११ बुलेटस्वारांना पकडून त्यांच्या बुलेटचा आवाज कायमचा बंद केला. पोलिसांनी या दुचाकीस्वारांवर थेट गुन्हे दाखल करुन ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. हा प्रकार कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री, महंमदवाडी परिसरात ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजता ते १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत चालला होता.
सुमीत वसंत सगट Sumit Vasant Sagat (वय २०, रा. इंदिरानगर, महंमदवाडी), शिवम दिपक जाधव Shivam Dipak Jadhav (वय २१, रा. इंदिरा नगर, महंमदवाडी), आर्यन जगन्नाथ गायकवाड Aryan Jagannath Gaikwad( वय १९ रा. इंद्रायणीनगर, महंमदवाडी), सार्थक प्रदिप अल्हाट Sarthak Pradip Alhat (वय १८ रा. कृष्णानगर महंमदवाडी), राज ऊर्फ यश सागर रणदिवे Raj aka Yash Sagar Randive (वय १९ रा. कृष्णानगर महंमदवाडी), तुषार नितीन गायकवाड Tushar Nitin Gaikwad (वय २१ रा. कृष्णानगर, महंमदवाडी), धिरज लक्ष्मण गजगे Dhiraj Laxman Gajge ( वय २३, रा. कृष्णानगर महंमदवाडी), प्रेम सिध्दार्थ गायकवाड Prem Siddharth Gaikwad (वय १८, रा. गोपाळपट्टी मांजरी), दयानंद रामचंद्र सुतार Dayanand Ramchandra Sutar (वय ५०, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी), वरद सनी तोडकर Varad Sani Todkar ( वय १८, रा. काळेपडळ, हडपसर), दिनेश रितेश लांबोटे Dinesh Ritesh Lambote (वय १९, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, महंमदवाडी), राजेंद्र सतिश वाघमोडे Rajendra Satish Waghmode(वय १८, रा. सुलाई कॉम्प्लेक्स मागे, महंमदवाडी), रवि किसन लोखंडे Ravi Kisan Lokhande(वय २०, रा. शेल पंपामागे महंमदवाडी) या मोटारसायकलचालकांच्या एकूण ११ मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत.
तसेच गॅरेज व्यवसायिक युसूफ फारुख शेख (वय २४,रा. गुलामअली नगर, सय्यदनगर, हडपसर), रोहन बबलू महापुरे (वय २४, रा. पोस्टमन कॉलनी, महंमदवाडी) आणि निखील फुलाजी सरडे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्या गॅरेजमध्ये मॉडीफाईड सायलेन्स्र बसविल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
सहायक पोलीस फौजदार राजस शेख, हवालदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी बुलेट चालक, तसेच दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बुुलेटसह ११ दुचाकी जप्त केल्या. मोटार वाहन कायदा, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम १२० अन्वये १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, सहायक पोलीस फौजदार राजस शेख, पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, लक्ष्मण काळे यांनी केली आहे.
