Pune Crime News | ‘पठारावरचा आहे मारा याला’ म्हणत टोळक्याने केला तरुणाचा खुन; पर्वती पोलिसांनी 5 जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत आंबेगाव पठारावरील मुलांबरोबर भांडणे झाली होती. त्यात त्याचा काहीही संबंध नव्हता़ असे असताना ‘हा पठारावरचा आहे, मारा याला’ असे म्हणत टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याचा खुन केला़ याप्रकरणी पर्वती पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
शुभम राजू घोडके (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकुश सुभाष कांबळे Ankush Subhash Kamble (वय १९), मुकुंद हिरामण राजगुरु Mukund Hiramani Rajguru (वय ३०), गणेश कदम (वय २२), अर्जुन विठ्ठल कांबळे Arjun Vitthal Kamble (वय २४), अनिकेत देवीदास कांबळे Aniket Devidas Kamble (वय २३, सर्व रा. वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यातील ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विष्णु शिवाजी शिरसाठ (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील पानमळा वसाहत येथील वृंदावन नर्सरीजवळ शनिवारी रात्री ९ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम घोडके हा वडगाव येथील एका वाशिंग सेंटरमध्ये काम करतो. तो शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुक पाहण्यासाठी सारसबाग येथे आला होता. या मिरवणुकीत आंबेगाव पठार येथील मुले आणि वडगाव येथील मुलांमध्ये भांडणे झाली होती. पठारावरील मुलांनी वडगावमधील मुलांना मारहाण केली होती. त्याचा शुभम घोडके याचा काही संबंध नव्हता. मिरवणुक पाहून तो रात्री घरी परत जात होता. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणा ही होता. ते वृंदावन नर्सरीजवळ थांबले असताना वडगाव येथील टोळके तेथे आले. त्यांनी शुभम याला पाहिल्यावर ‘‘हा पठारावरचा आहे मारा याला’’ असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शुभम यांच्या मेव्हण्याने त्याला वाचविले. त्यानंतर हे टोळके पळून गेले. शुभम व त्याचा मेव्हणा हे रिक्षा करून घरी निघाले. वाटेत शुभम याला खुप त्रास होऊ लागला. तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावून शुभमला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम घोडके याचा मृत्यु झाला. पर्वती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करीत आहेत.
