Pune Crime News | सराईत अल्पवयीन गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतुस खंडणी विरोधी पथकाने केले जप्त
पुणे : Pune Crime News | आदर्शनगर ते उरुळी देवाचीकडे जाणार्या कच्च्या रस्त्याशेजारील मोकळ्या जागेत कमरेला पिस्तुल जाऊन बसलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले. हा सराईत बालगुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.
खंडणी विरोधी पथक २२ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत समजले की, आदर्श नगर ते उरुळी देवाची कडे जाणार्या रोडशेजारील मोकळ्या जागेत एक जण कमरेला पिस्टल लावून फिरत आहे. या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील १ गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रदिप परीट, दयानंद गायकवाड यांनी केली आहे.
