Pune Crime News | अंमली पदार्थाच्या तस्करीत फरार आरोपीला पकडून वानवडी पोलिसांनी घरातून जप्त केले एमडी, पिस्टल,  2 मॅगझीन, 7 जिवंत काडतुसे

Pune Crime News | Wanawadi police arrested an absconding accused in drug smuggling, seized MD

पुणे : Pune Crime News |  अंमली पदार्थाच्या तस्करीतील फरार आरोपीला कॅम्पमध्ये पकडून त्याच्या घराची झडती घेतली. त्यात २७ लाख ६० हजार रुपयांचे ९२० ग्रॅम एम डी अंमली पदार्थ, ४७ हजार रुपयांचे गावठी पिस्टल, २ मॅगझीन, ७ जिवंत काडतुसे असा २८ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

अक्रम अजिज  शेख Akram Aziz Shaikh (वय ३२, रा. गुलटेकडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

वानवडी पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी केल्याबद्दल एकाला पकडले होते. त्याचा साथीदार अक्रम शेख हा तेव्हापासून फरार होता. २१ एप्रिल रोजी वानवडी पोलिसांना फरार अक्रम शेख हा कॅम्प येथे येणार असल्याची बातमीदाराकडून बातमी मिळाली. त्या नुसार पोलिसांनी कॅम्पमध्ये सापळा रचून अक्रम शेख याला पकडले. वानवडी पोलीस ठाण्यात नेऊन त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली. त्यात ९२० ग्रॅम एम डी पावडर, पिस्टल, २ मॅगझीन, ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक उल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, सुषमा घोळवे, रक्षा राहुलकर यांनी केली आहे.

You may have missed