Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन दोन वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3 लाखांच्या सोनसाखळ्या नेल्या चोरुन

crime

पुणे : Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी दोन घटनांमध्ये २ वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ लाखांच्या सोनसाखळ्या काढून कागदात बांधून देत असल्याचे सांगून  हातचलाखी करुन चोरुन नेली.

याबाबत पाषाण येथील ७५ वर्षाच्या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पाषाण येथील मोरया रेसिडेन्सी आणि रिलायन्स मार्ट येथे २१ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सकाळी फिरायला गेल्या होत्या. घरी परत येत असताना वाटेत दोघांनी पोलीस असल्याची बतावणी केली. पुढे काही महिलांच्या सोन्याच्या चैन आणि मंगळसुत्र हिसकावुन घेतलेल्या आहेत, असा बनाव केला. तुम्ही तुमची सोनसाखळी काढून व्यवस्थित ठेवा, असे सांगितले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ही कागदामध्ये बांधून ठेवून देतो, असे सांगून पावणे दोन लाखांची सोनसाखळी हातचलाखी ने काढून घेत. खोट्या अंगठ्या कागदात बांधून देऊन त्यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत.

दुसरी घटना नर्‍हेगावातील झील कॉलेज चौकाजवळील सेल्सीया पार्क बिल्डिंगच्या समोर २० एप्रिल २०२६ रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.

नर्‍हेगावात राहणार्‍या ७५ वर्षाच्या महिला गाडीवरुन जात असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी या महिलाना साहबने आपको ठेहरने के लिय बोला था, आप क्यु नही रुके, साहब चेकिंग के लिए आये है, आप के गले का सोने का चैन कोई तो छीन लेगा, आप के गले मे से चैन निकालके रखो, असे बोलले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने गळ्यातील ९० हजार रुपयांची सोन्याची चैन एका वहीच्या कागदी पानात ठेवून त्याची पुडी करुन फिर्यादीचे गाडीच्या डिक्कीत ठेवले, असे फिर्यादीस भासवुन सोन्याची चैन हातचलाखी करुन काढून घेऊन चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.

You may have missed