Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने जप्त केला 3 गावठी पिस्टल, 12 जिवंत काडतुसाचा शस्त्रसाठा

Pune Crime News | Crime Branch Unit 3 team seizes 3 village pistols, 12 live cartridges from innkeeper

पुणे : Pune Crime News |  खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सागर दत्तात्रय सोनलकर Sagar Dattatreya Sonalkar (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे, मुळ रा. डिएस के पायथा, धायरी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने   पिस्टल बाळगले असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.

सागर सोनलकर याच्यावर शिरुर पोलीस ठाणे आणि हवेली पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो धायरीमध्ये रहायला होता. सध्या तो नर्‍हे येथे रहायला आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार गुन्हेगार चेक करुन कारवाई करण्याचे काम करत होते. सिंहगड रोड परिसरात ते पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली. 

या बातमीवरुन पोलिसांनी सागर सोनलकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे मिळाली. त्याला अटक करुन अधिक तपास करण्यासाठी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. घरात आणखी २ गावठी पिस्टल आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्याला अधिक तपासासाठी नर्‍हे पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. त्याने ही पिस्टल कोणाकडून आणली. कशासाठी तो एकावेळी ३ पिस्टल बाळगुन होता, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुनला, योगेश झेंडे यांनी केली आहे.

You may have missed