Pune Pimpri Crime News | ट्रॅफिक वार्डनने वाहतूक शाखेने डिटेन केलेली दुचाकी चोरुन नेऊन केली सोनसाखळी चोरी, वाकड पोलिसांनी पकडून 3 गुन्हे आणले उघडकीस

Pune Pimpri Crime News | Traffic Warden stole a two-wheeler detained by the traffic branch and stole a gold chain, Wakad police caught him and brought 3 crimes to light

पिंपरी/ पुणे : Pune Pimpri Crime News |  चतु:श्रृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वार्डन म्हणून काम केले़ वर्तवणुक चांगली नसल्याने त्याला ५ महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकले. त्या दरम्यान, वाहतूक विभागाजवळ डिटेन करुन ठेवलेल्या दुचाकीमधील एका स्कुटर चोरी करुन या वार्डनने वाकड परिसरात सोनसाखळी हिसकावून नेली होती. वाकड पोलिसांनी या माजी ट्रॅफिक वार्डनला अटक करुन त्याच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत

सचिन मानसिंग चव्हाण Sachin Mansingh Chavan (वय २७, रा. रानवडे चाळ, बोडके वस्ती, मान रोड, माण) असे या चोरट्याचे नाव आहे.

एक महिला ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे सात वाजता थेरगाव येथील गणेश मंदिर परिसरात मॉर्निग वॉक करत असताना जांभळ्या पांढर्‍या रंगाचे मोपेडवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसका मारुन चोरुन भुमकर चौकाच्या दिशेने तो पळून गेला होता. वाकड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथकाने घटनास्थळ व आजू बाजूच्या परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे निरीक्षण करुन चोरट्याचा येतानाचा व जातानाचा मार्ग निश्चित केला. माण हिंजवडी येथून जांभळ्या पांढर्‍या रंगाच्या अ‍ॅक्टीव्हा मोपेडवरील संशयित आरोपी सचिन चव्हाण याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करुन केलेल्या चौकशीत वाकड पोलीस ठाण्यातील दोन चैन चोरीचे गुन्हे, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा १ गुन्हा उघडकीस आणला. त्याच्याकडून या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल व एक होंडा अ‍ॅक्टिव्हा असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

सचिन चव्हाण हा चतु:श्रृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वार्डन म्हणून काम करत होता. परंतु, त्याची वर्तवणुक चांगली नसल्यामुळे त्याला ५ महिन्यांपूर्वी कामावरुन काढून  टाकले. त्यानंतर त्याने मार्च २०२६ मध्ये वाहतूक विभागाजवळ डिटेन करुन ठेवलेल्या दुचाकींमधील एका होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कुटर चोरुन नेली. त्याचा वापर सोनसाखळी चोरीसाठी केलेला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुºहाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस रिीखक अंबरिश देशमुख, श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विभीषण कºहेरकर, सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी, पोलीस हवालदार चंदु गिरे, साबळे, घाडगे, वडेकर, भुसारे, पोलीस अंमलदार तात्यासाहेब शिंदे, झेंडे, कौतेंय खराडे, विक्रम भगत, कांबळे, मांडे, गायके यांनी केली आहे.